Tuesday, November 10, 2020

   

पुस्तकं नेहमीच आपल्याला काहीतरी देत असतात. ते आपले व्यक्तिमत्व विकसित करतात.आपल्याला घडवतात. त्यांना जे सांगायचं ते आपल्याला सांगतात आणि त्यानुसार आपल्याला वागायचं की नाही ते आपल्यावर सोडतात. मग एकेक पुस्तक आपल्याला आवडत जाते आणि त्यांच्याशी आपला संवाद होत जातो. असाच संवाद निखिलेश चित्रे यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकांशी केला आहे आणि तो आपल्याला वाचायला मिळतो “ आडवाटेची पुस्तके” या त्यांच्या पुस्तकात.

निखिलेश चित्रे आपल्या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात, “ ही समीक्षा नाही, तर आवडलेल्या पुस्तकांविषयी इतर वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. वाचनआनंदाबरोबरच या पुस्तकांनी कल्पित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू व्यापक बनवली. तिला स्वच्छपणा दिला.’ आडवाटेवरची पुस्तके” या पुस्तकात लेखकाने त्याला आवडलेल्या पुस्तकांविषयी लिहले आहे. ते वाचत असतांना वाचकांची त्या पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढते आणि ती पुस्तके कुठे मिळतील याचा शोध वाचक घेवू लागतो.त्या पुस्तकात जवळजवळ चाळीस पुस्तकांचा परिचय करून दिला आहे.त्यामुळे आपण पुस्तकांच्या आडवाटेवरून एका वेगळ्या चांगल्या मार्गावर आल्याचे समाधान आपल्याला मिळते.
त्यांनी वाचलेली पाश्चात्य आणि पौर्वात्य साहित्य सहजपणे आपल्या नजरेखालून गेलेली नाहीत याचे भान मला आले. त्यांनी अपभ्रंश भाषेतील पुष्पदंत कवीचा ‘जसहर चरिऊ ‘ हा कथासंग्रह , ‘पुरुरवा, उर्वशी,आस्थान, यम-यमी संवाद’, पंचतंत्र, जातककथा,कुवलयमाला , लीळाचरित्र ,दृष्टांतपाठ ..आदि पुस्तकांचा संदर्भ त्यांनी दिला आहे. यातील सगळी पुस्तके मी वाचलेली नाहीत. किंबहुना काही पुस्तकांची नावेही मला माहिती नव्हती.
चित्रे यांनी अनेक पाश्चात्य लेखकांविषयी लिहले आहे. बर्नादो सोर्स या लेखकाच्या “परिणामकारक स्वप्ने पाहण्याची कला” या लेखाबद्दल ते लिहतात ... “पण व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरातही तिचा चांगलाच उपयोग होऊ शकेल. यातील काही पुस्तके वाचल्यावर ते म्हणतात की ,मला खूप थकवा आला. अस्वस्थता आली, बैचेन झालो.त्यांनी पुस्तकांची वैशिष्टे आपल्याला इतकी छान सांगितली की त्या पुस्तकाचा शेवट काय असेल, नक्की त्या पुस्तकात कोणते शब्द वापरले असेल याची आपल्याला उत्सुकता वाटते. त्यांनी पुस्तकाच्या गाभ्याला अचूक हात घातला आहे. Granta books ने प्रकाशित केलेली दोनशेसाठ पानाची कादंबरी, “ दातांपासून दातांकडे “ वाचली की आपणही आपले दात चाचपत राहतो. असे ते लिहतात. साहित्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी वाचावी अशी अनेक पुस्तके त्यांनी वाचली आहे आणि आपणही ती वाचावी असे आपल्याला वाटते.
पुस्तकांवर लिहलेली पुस्तके आपल्याकडे फारशी नाहीत.पण हे पुस्तक तसेच काहीसे आहे.मुख्य म्हणजे आपण सगळेजण वेगवेगळी पुस्तके वाचत असतो पण त्याबद्दल कधी फारसे बोलत नाही किंवा जे बोलतो ते अतिशय मोघम असते.एखादे पुस्तक आवडले, फार छान,किंवा आवडलं नाही अशी प्रतिक्रिया आपण देतो ,त्यामागचे कारण देण्याची तसदी आपण घेत नाही. अशा पुस्तकांमुळे आपण पुस्तकांकडे कसे पहावे हे मी शिकत आहे.
No photo description available.
Chaitali Ranbhor, Drpriti Mangesh Kulkarni and 24 others
12 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment