Friday, September 30, 2011

आपल्यावर सतत काही न काही आदळतच असतं. कितीही नकार दिला तरी काही गोशी नाकारता येत नाही. मग आपण लटकत राहतो. ल्त्क्न्म म्हटलं कि डोळ्यासमोर काय येतं. आपण दोरीला बांधलो गेलो आहोत. मधल्या मध्ये लटकत आहोत.
सतत वाद घालणारी माणसं माझ्या डोक्यातून काहीतरी मला हवं असणारं शोषून घेतात,असं सारखं वाटतं. एकही शब्द बोलला नाही तरी त्य्म्ना वाद कसा घालता येतो कळत नाही. सतत तक्रार ,सतत भांडणं,कुणाच्या तरी चहाड्या,लबाड्या,मारामारी,राजकीय नेत्यांची टोलवाटोलवी उबग आणते,या सगळ्यातून बाहेर पडून निभाव कसा लागणार याची काळजी करत राहतो.त्यातून निभावलो तरी आपलं आपल्याजवळ असेल ना?