Sunday, October 9, 2011

मागे पडत जाणारी माणसं किंवा ज्यांना वेगाच्या,गतीच्या बरोबर धावता येत नाही अशी माणसं किंवा ज्यांना बदल स्वीकारता येत नाही,त्या बदलत आपलं स्थान कोणतं याचा हिशोब लागत नाही अशी माणसं अस्मिता अस्मिता म्हणून ओरडतात. असे कधी कधी वाटते.कोणी काही नवीन केले,किंवा एखादा जुना विषय,इतिहास कालीन व्यक्ती किंवा ताजा विषय पण नवीन दृष्टीने पहिला तर या माणसांना ते स्वीकारणे अवघड जाते. त्यांना एका स्थिर जगात राहयचे आहे असे वाटते. शिवाय त्यांचे अस्तित्वच मुळी त्या बदलांना विरोध करण्यापुरते दिसते. इतरवेळी ही माणसं काय करतात.घरकाम करतात का? बाहेर कुठे नोकरी करीत नसावीत.शिकली सवरली असली तरी फार जाणीवपूर्वक झालेलं नसावं नाहीतर बदलांना अशा पद्धतीने सामोरी गेली नसती.

Monday, October 3, 2011

मन कधी कधी अजिबातच शांत होत नाही. पुस्तकं,पेन,हवा,गाणं,काही काहीच त्याला नको असतं.नुसत बसून राहण्म्ही त्याला जमत नाही. काय करायचं असतं त्याला कोण जाणे. सतत सतत काहीतरी चांगलं करण्याचा त्याचा प्रयत्न एवढा कसा फसतो या सगळ्याचा तन त्याच्यावर पडतो. खूप खूप अस्वस्थ वाटतं. काही जमणार आहे का आपल्याला? काय ह्व्य्म? पैसा,प्रसिद्धी की काम करण्याचा आनंद. तो शोधेपर्यंत कोणी कुवतीवर हल्ला करत,तेव्हा परत पहिल्यापासून सुरुवात करण्याची ताकद कुठून आणायची-सगळच सोडून दिलं.झाल.

Saturday, October 1, 2011

जगणं म्हणजे काय? आणि जगायचं कशासाठी? नैराशी आल्याने हा प्रश्न पडलेला नाही. सहज काम करता करता वाटत गेलं की, या कामासाठी जगायचं का? की यासाठी? कळेचना.त्याच बरोबर हे ही समजलं की आपल्या अंतापर्यंत बरोबर येईल किंवा त्याचसाठी जगायला पाहिजे अस्म कोणतही काम नाही. मग जगायचं आहे म्हणून काही न काही काम करायलाच पाहिजे म्हणून काम करायचं बस. फुग्यातून हवा काढल्यासारखं हलं. वाटायला लागल.जमीन तर पायाखाली होतीच. पण आता सर्वच त्यावर झोकून दिल.माझ्याशिवाय होणार नाही अशी कोणतीही गोष्ट जगात नाही.हे पार अंतर्मनात स्वतःला न दुखवता समजलं ना की फार छान वाटतं. मग तन राहतच नाही. ताणरहित राहण्यासाठी जगायचं कशासाठी याचं उत्तर आपल्याला शोधायलाच हव.