Thursday, February 14, 2013


प्रवासाला जायचे म्हटले की सगळ्या काळज्या आणि सगळे ताण एका क्षणात मिटतात.या मागे जिथे जाणार असू त्या जागेचे कौतुक तर असतेच पण त्या पेक्षाही त्या ठिकाणा पर्यंत चा गाडीने होणार प्रवास खूप  असतो. गाडीत कोणीही ओळखीचे नाही. पिशवीतून सारखं काही काढायचं नाही. शांत बसून राहायचे.वाटलं तर वाचायचं ,बाहेर बघायचे.नाहीतर डोळे मिटून आत खोलवर डूबायचे. यातून जो आनंद मिळतो तो लाजवाब असतो. त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही.माझाही प्रवास असाच चालला होता. तर एक बाई माझ्या शेजारी येवून बसल्या. त्यांना गाडीच्या सिटचा त्रास होत होता.मान दुखत होती. असा त्रास खरच खूप जणांना होतो. मग त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली.पाऊस,महागाई,सतत बदलणारा समाज आणि त्यातील असुरक्षितता याबद्दल  सगळ्यांना असणारी खंत  त्या ही बोलून दाखवत होत्या. आमच्या गप्पा चांगल्या रंगात तेवढ्यात त्या म्हणाल्या ,तुम्ही नक्कीच पुण्यातल्या असणार. मी म्हटलं नाही मी निफाड ची आहे.तर ती म्हणाली,तुमच्या भाषे वरून तसं वाटत नाही.  अरेच्या चांगली भाषा ही काय कोणाची मक्तेदारी आहे का?त्या बाई च्या पेहरावा वरून त्या मराठी बोलतील असं कोणाला वाटलं नसतं ,पण मला काही आश्चर्य वाटलं नाही. माझ्या अनेक मैत्रिणी छान मराठी लिहतात.
  आपण भाषे वरून,पोषाखा वरून,जाती,धर्म.वंश,देश, राज्य अशा किती गोष्टी स्वतःला विभागणार आहोत.या सगळ्या गोष्टी मुळे आपली  सुरक्षितता आपणच नष्ट  करीत आहोत.एका असमाधानी  आत्मा सारखे आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत फिरत आहोत.प्रत्येक नेता स्वतः च्या फायद्या साठी आपला उपयोग करीत आहे. त्यापेक्षा आपण  प्रत्येकाने आपला शेजारी ,मग तो कुठलाही जाती,धर्माचा असो त्याच्या शी माणुसकीच्या नात्याने वगयला हवं.कारण सगळ्या जातीला आणि धर्माच्या लोकांना महागाईला तोंड द्यावच लागतं,त्यांना तहान लागते,भूक लागते,ते ही आजारी पडतात.त्यांनाही पैसा लागतो.पण आपण ऐक मेकां वरचा विश्वास घालवून बसलो आहोत. बघा ना त्या माझ्या बस मधल्या शेजारणी ला मी पोलो ची गोळी दिली तर तिने क्षणभर माझ्या कडे अविश्वासा च्या नजरेने पाहिलं आणि मग गोळी खाल्ली.वरून तिने मला तिच्या या कृतीचे स्पष्टीकरण  दिले.म्हणाली ,” आजकाल कोणी काही खायला दिलं की खायची भीती वाटते” अशी ही असुरक्षितता आपल्यातील चांगल्या भावना नष्ट करीत आहे. कोणाही नेत्याच्या मदती शिवाय आपणच एकमेकांना समजून घेतलं तर आपण सगळेच सुरक्षित होवू असं तुम्हांला ही वाटतं ना?