Friday, August 29, 2014

जीवनातला वेषांतर केलेला शिक्षक "अनुभव"


   जीवनात समोर येणाऱ्या अनुभवांच्या एक पाउल अलिकडेच आपली परिपक्वता असते.आपल्यात परिपक्वता यावी हाच अनुभवांचा  खरा हेतू असतो.पण प्रत्येक अनुभवाबरोबर आपली समज वाढत जाते आणि त्या बरोबर आपल्या समोरील आव्हानेही वाढतात.अशा प्रकारे आपल्या जीवनाची वाढ ही नागमोडी वळणे घेत होत असते.
  तुम्ही किती ज्ञानी आहात,तुम्ही किती जीवन पाहिलं आहे,किवा तुम्ही जे करतात त्यात किती उत्तम आहात,एवढेच नाही तर तुम्ही जीवनाचा ज्ञानकोश आहात हे फार महत्वाचे नाही...कारण असं असलं तरी जीवनातल्या कोणत्यातरी कोपऱ्यावर मंदी,पडणे,कोसळणे हिंडत असते.जीवन नेहमी आपला प्रवाह,ताल बिघडविण्याचा प्रयत्न  करत असते.
    पण नेहमी आपली झालेली  वाढ लक्षात ठेवा, दहावीत नापास होण्याचे अपयश हे आठवीत पास झाल्यापेक्षा अधिक आहे.माउंट एव्हरेस्ट चढण्याची एक संधी हुकली तर स्थानिक डोंगरावर चढणे सुद्धा कमी दर्जाचे समजले जाते.जेवढी उच्च परिपक्वता तेवढी अधिक आव्हाने.जीवन व्यक्तीला असेच मोल्ड /साच्यात बसवत तयार करत असते.
  जीवन हा असा प्रवास नाही जो दोन पाऊले पुढे आणि एक पाऊल मागे येते. असे तेव्हाच होते जेव्हा माणूस जाणीवेशिवाय जगत असतो,आणि त्याच्या अनुभवातून तो काहीच शिकत नाही.माणसाची जाणीवच त्याला प्रत्येक अनुभवातून शिकण्याचे प्रशिक्षण देते,जरी तो स्प्रिग च्या कापडावर खाली वर होत असला तरी तो प्रत्येक पडण्यानंतर परत उठतो आणि परत पडतो आणि उठतो..पण प्रत्येक पडण्यानंतर अधिक वर उठतो. नंतरच्या प्रत्येक वरच्या पाउलागणिक त्याची परिपक्वता आणि त्याच्या आव्हानांची पातळी या दोन्हीत वाढ होते.
   आपल्या  यशाचे कारण काय?”चांगला निर्णय” ,चांगला निर्णय घ्यायला आपल्याला  का शक्य झालं?जीवनातल्या अनुभवांमुळे “तुम्ही जीवनातल्या अनुभवांकडून कसा लाभ करून घेतला? “वाईट निर्णय” घेवून.मी या अनुभवांना स्प्रिंगवरच्या कपड्यावरचे अनुभव समजते.
जीवनातल्या स्प्रिंगच्या कपड्यावरचे अनुभवावर,मी प्रत्येक अनुभवागणिक वाढत गेले..प्रत्येक अनुभव मला काय हवे ते देत गेला किंवा त्याने मला काय नको याची जाणीव करून दिली.

  नंतरच्या वेळेला आपल्याला  मिळालेले अपयश हे आपल्याला   अस्वस्थ करते पण आपण हे लक्षात ठेवायला हवे की  ,जीवनाने आपल्याला  दिलेला अनुभव हा वेषांतर केलेला शिक्षक आहे.,आपल्यातील  परिपक्वता वाढवण्यास मदत करण्यासाठी तो येतो.आपल्याला झालेली जाणीव  त्या अनुभवातून आपली परिपक्वताच वाढविण्यासच  फक्त मदत करत नाही तर अधिक उच्च आव्हाना साठी तयार होण्यास सांगते..आपल्या सारख्या मर्त्य लोकांना पडणे आणि उभे रहाणे  हा आशीर्वाद आहे कारण त्यामुळे आपल्या प्रत्येक उभे रहाण्यातून थोडे वर जात असतो.  

Monday, August 25, 2014

मार्गदर्शन करण्यापेक्षा आदर करणे अधिक गरजेचे आहे.



   मालकी दाखविण्याचे शिकण्याआधी तिला  शेअर करण्यास सांगितले होते. जेव्हा ती पाच वर्षाची होती तेव्हा तिला तिच्या दोन वर्षाच्या भावासाठी त्याग करण्यास सांगितले होते.ती स्वतःच लहान होती,पण तिचे पालक तिच्याकडून जबाबदार बहिणीच्या भूमिकेची  अपेक्षा करत होते. तीस वर्षा नंतर तिला तिचे कुटुंब होते तसेच तिच्या भावाचेही होते.तरी ती स्वतःला भावाच्या बाबतीत जबाबदार समजत होती. तरी ती त्याला उपदेश करत असे,जेव्हा त्याच्या लग्नात काही तरंग उमटायचे तेव्हा ती त्यांच्या मध्ये पडायची,भावाच्या बायकोला मुलाला कसं खायला घालायचं हे सांगायची,मुलांना कसं वाढवायचं हे सांगायची.ती अजून सुद्धा त्याग करायची,पण तिला परत काय मिळत होते? बेपर्वाईच्या  वागणुकी बरोबर तिला मिळत होते हृदयविकार,झोपेविना रात्री आणि भरपूर अश्रू .का? खरं तर  तिचा भाऊ स्वतःचे निर्णय घेण्या इतका मोठा आहे.जरी त्याचे काही निर्णय चुकीचे होते तरी त्याला असे वाटत होते की त्याला अशा चुका करण्याचा हक्क आहे,त्याला वाटायचे की या चुकण्यातूनच तो शिकणार आहे. तिच्या वहिनीला तिची म्हणजे ताईची /नणंदेची  कुटुंबातील ढवळाढवळ आवडत नव्हती. तिचा असा विश्वास होता की तिला तिच्या मुलांना स्वतःच्या मताने वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणी केवळ वयाने मोठे आहे म्हणून उपदेश करत असतील तर ती त्यांचा तिरस्कार करेल.
   पहिला शब्द बोलण्यापासून,पहिला शब्द लिहता येण्यापासून आणि पाहिलं पाउल टाकण्यापासून ...त्याच्या वडिलांचा त्यात महत्वाचा सहभाग होता.मुलासाठी त्याचे वडिल नेहमीच सुपरमन होते,तेच त्याचे हिरो होते आणि त्यांच्याशीच तो स्पर्धा करू इच्छित होता. मुलाला करीयर समुपदेशन सुद्धा वडीलच करत होते.मुलाला त्यांच्या घराण्यातील पहिला उद्योजक व्हायचं होतं आणि तिथेही त्याचे वडीलच त्याला मार्गदर्शन करते होते. आज मुलगा प्रसिद्ध उद्योजक आहे.आजही वडिल तो रात्री घरी आली की कामावर काय झाले हे विचारतात आणि सूचना करतात ,पण यामुळे मुलाला त्यांचे भय वाटते.त्याला असे वाटते की वडिलांनी त्याला अधिक अवकाश दिला पाहिजे. वडिल काहीसे निराश झाले आहेत कारण त्यांना मुलाकडून हवं तसं लक्ष दिलं जात नाही असे वाटते. त्यांना वाटते की,मुलाला आता त्यांची गरज नाही.याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आहे,ते लवकर म्हातारे व्हायला लागले आहेत.
तुम्ही एखाद्याची नेहमी बहिण असतात,पण तुम्ही कायम बहिणीची भूमिका करू शकत नाही.तुम्ही कायमच प्रेमळ पालक असतात,पण कायम तीच भूमिका घेतली पाहिजे असं नाही.एका बिंदू नंतर कोणीही तुमचा पवित्र दृष्टीकोन स्वीकारू शकत नाही.
     तीन वर्षाचे मुल एका विशिष्ट सन्मानाची अपेक्षा करते आणि त्याला त्याच प्रकारच्या आदराची गरज असते. तीन वर्षाच्या मुलीला हवे असणारे कपडे घालू दिले नाही तर तिला वाटते की तिचा कोणी आदर करत नाही.दहा वर्षाचे मुल स्वतः मेनूकार्ड वाचून ऑर्डर देवू इच्छितो.तिच त्याला आदर देण्याची कल्पना असते. टीनएजर म्हणून तिला तिच्या मैत्रिणीची निवड करायची असते,आणि पालकांनी तशी करू देणे म्हणजे तिचा आदर करणे होय. त्याने तुमच्या बरोबर काही वर्षे काम केले ,त्याला स्वतःला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्याच्या निर्णयावर खूष आहात ,ही कृतीच त्याच्यासाठी आदर दाखविण्याची आहे.प्रत्येक वयाला आणि जीवनाच्या प्रत्येक घडीला आदर जोडलेला असतो आणि  तुम्ही तो दाखविण्याची गरज असते.
     एखाद्याला मार्गदर्शन करण्याचा,विशेषतः कोणी न मागता सुद्धा मार्गदर्शन करण्याचा हेतू जरी चांगला असला,तरी त्या व्यक्तीला तिचा आदर केला जात नाही असं वाटण्याची शक्यता असते. आपला आदर करावा याची गरज ही मार्गदर्शन करावे यापेक्षा अधिक असते.

   इतरांचा आपण आदर करत आहोत....ही  तुमची निवड  असू द्या..ते तुमचे मार्गदर्शन घेतील.......ती त्यांची निवड असू द्या.

Wednesday, August 20, 2014

श्रेष्ठ कमी आणि क्षुल्लक अनेक


    इटालियन अर्थतज्ञ विल्फ्रेडो  पर्तो ( vilfredo pareto ) यांनी १८९७ मध्ये ८०/२० चे तत्व शोधून काढले.,जे आज paretoचे नियम म्हणून वापरले जाते. त्याने असे शोधले की ८० टक्के काम हे २० टक्के इनपुट दिल्याने होते.२० टक्के कारणांमुळे ८० टक्के फळ मिळते,आणि ८० टक्के परिणाम हे २० टक्केच्या परिश्रमामुळे मिळतात. जोसफ  जुरान यांनी २०% ना “महत्वाचे पण संख्येने कमी ” आणि ८०% ना “ खूप पण क्षुल्लक /सामान्य पण संख्येने जास्त” असे संबोधले आहे.सर आयझक पिटमन ,ज्यांनी शॉर्टहान्ड चा शोध लावला त्यांनी असे शोधले की आपल्या २/३ संभाषणात नेहमी वापरले जाणारे शब्द फक्त ७०० आहेत. त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या ८०% बोलण्यात नेहमी हेच शब्द यतात.
    विद्यार्थी त्यांचा ८०% अभ्यास हा २०%तासिकांमध्ये पूर्ण करतात.परीक्षेतील प्रश्नपत्रिका ह्या २०% अभ्यास क्रमावर  आधारित असतात.२०% ग्राहक  व्यवसायातील ८०% नफा,वाढ आणि समाधान देतात.२०% उत्पादन आणि सेवा ह्या ८०% टर्नओव्हर करतात.२०%कामगार ८०% उत्पादन तयार करतात. २०% च्या मतांमुळे समाजाची  व्याख्या केली जाते.लोकसंख्येतील २०% च्या उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची व्याख्या केली जाते. जर तुमच्या विक्री व्यवस्थेत २० लोक असतील आणि त्यातील चारजण खूप मस्त काम करणारे असतील,आणि सहाजण हे मध्यमप्रतीचे असतील आणि दहाजण हे फक्त असतील.तर अशावेळी विक्री व्यवस्थापक बाकीच्या लोकांना अधिक उत्पादनक्षम बनविण्याची चूक करेल,जेव्हा उत्तम काम करणाऱ्याकडे लक्ष न देता तो त्यांना गृहित धरेल.जर तुमची विक्री वाढवायची असेल तर त्या उत्तम लोकांकडे लक्ष देणे आणि न काम करणाऱ्यां कडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. उत्तम लोकांकडे अधिक लक्ष देणे आणि त्यांना अधिक बळकट करण्यावर भर दिला पाहिजे.
  ८०/२० हे कमी लोकांकडून अधिक प्राप्त करण्याचे रहस्य आहे. सरासरी मेहनत वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा  अपवादात्मक उत्पादकता साजरी करायला सुरुवात करा. अनेकां कडून पुरेसे चांगले कामाची अपेक्षा करण्यापेक्षा थोड्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्तम मिळवणे सोपे आहे.
  सगळीकडे वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे.तुमच्या जीवनातले ४/५ पैकी फार थोडे तुम्हांला परत मिळते.कारण २०% पेक्षा ८०% वर आपण अधिक भर देतो. तुमच्या  विचारात परिवर्तन आणा.तुमचा दृष्टीकोन दुरुस्त करा. तुमचे स्त्रोत हे अनउत्पादक “क्षुल्लक पण अधिक”यांच्यापासून ते उत्पादक “श्रेष्ठ पण कमी” यांच्यामध्ये परत विभागित करा. ८०% बाबत काय घडते आहे हे दाखवणे म्हणजे परिणामकता नाही तर त्या २०% चे तुम्ही कसं नियोजन करतात,त्यांच्यावर नियंत्रण कसं करतात आणि त्यांचा उपयोग कसा करतात हे महत्वाचे आहे.तुमच्या आयुष्यातील २०% वेळ हा तुम्ही काय आहात आणि काय असणार आहात हे सांगण्यात जातो.

  त्या २०%वर  लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमच्या आयुष्यातील ८०% भागाची आपोआप काळजी घेतली जाईल.

Thursday, August 14, 2014

तुमचे महत्व

.तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंपेक्षा तुम्ही स्वतः जास्त महत्वाचे आहात.

   पती त्याच्या पत्नीला तिच्या वाढदिवसा निमित्ताने एक कार भेट देतो. तो प्रथम तिच्या हातात गाडीच्या किल्ला देतो,नंतर एक पाउच ज्यात आवश्यक कागदपत्र असतात,जसे ड्रायव्हिंग लायसन असते,आणि हे सगळे दिल्यांनतर तो तिला मिठीत घेतो.नंतर तिला लॉंग ड्राईव्हला जायला सांगतो आणि त्याच बरोबर मुलांची काळजी घ्यायला सांगतो.ती त्याला कीस करून आभार मानते आणि कार घेवून ती जाते.एखाद्या किलोमीटर जात नाही तर कशाला तरी जाऊन धडकते. ती सुरक्षित असते पण गाडीला पोचा पडतो.तिला सारखे अपराधी वाटत असते की,ती आता त्याला काय सांगायचे?तो हे सगळं कसं घेईल? विचार आणि भावना ह्या माठेफिरुसारख्या धावत असतात.पोलिस अपघाताच्या जागी लगेच येतात.” आम्ही तुमचे लायसन बघू शकतो का? असं म्हणत ते लायसन मागतात.तिचे हात थरथरत असतात,ती त्या पाऊच पर्यंत जाते जे तिच्या नवऱ्याने तिला दिले होते.तिच्या गालावरून अश्रू ओघळत असतात,ती पाऊच मधून जेव्हा लायसन बाहेर काढत असते तेव्हा तिला त्या पाऊच मध्ये एक नवऱ्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी सापडते.त्यात लिहलेले असते,”प्रिये,जर कधी अपघात झाला तर लक्षात ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो कार वर नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे.”
   आशीर्वाद तेच देतात जे समजतात की ते माणसांवर प्रेम करतात वस्तूंवर नाही,आणि आवडत्या वस्तूंना आणि उपयोगी माणसांना आशीर्वाद दिले जात नाही.
   कारवरचा एखादा ओरखडा आपले ब्लड प्रेशर वर नेतो ...पण आपल्याला असे वाटत नाही की आपलं मनच आपल्या हृदयावर ओरखडे मारत आहे. मला असा माणूस माहित आहे ज्याने  त्याला आवडणारी वस्तू  हेतुपूर्वक जमिनीवर फेकली  आणि नंतर म्हटले की,” अठरा वर्षापासून ही वस्तू मला ताण देत आहे.मी सारखा विचार करायचो की, –जर ही वस्तू  पडली तर,जर ती मोडली तर....म्हणून मग मला  वाटले  की ,कोण बॉस आहे हे दाखवून देण्याची  आता वेळ आली आहे आणि त्यामुळे मनाला शांतता तरी मिळेल.” 
मला असाही  एक माणूस माहित आहे ज्याने त्याच्या  मर्सिडीज बेन्जचा अपघातात पार चक्काचूर झाला म्हणून पार्टी ठेवली होती.तो म्हणाला,जरी माझी कार पूर्ण खराब झाली तरी मला त्याचे काही विशेष वाटत नाही,कारण गाडीत कोणीच नव्हते. आता मी एकदम व्यवस्थित असल्याने दुसरी कार घेवू शकतो,पण जर कार नीट राहिली असती आणि मीच गेलो असतो तर ---ती गोष्ट योग्य झाली नसती.
      आपलं जीवन ६०रु.च्या कारने सुरु होतं,जेव्हा ती मोडते तेव्हा आपण भोकाड पसरतो .नंतर आपण २००० रु. रिमोट कंट्रोल कार घेण्या इतके मोठे होतो,आणि जेव्हा ती कार खराब होते तेव्हा आपण रडतो.नंतर आपल्याला २०,००० रुपयाची बँटरीवर चालणारी कार भेट मिळते. जेव्हा ती काम करायचे थांबते,तेव्हा आपण निराश होतो.नंतर ४ लाखाची कार येते,मग २२लाखाची सुव ,नंतर ८६ लाखाची लक्झरी सदन....आणि प्रत्येक वेळेला मशीन बरोबर काहीतरी होते,कधी ओरखडा,कधी पोचा.आपल्या तणावाचा आणि चिंताचा पारा वर चढत च जातो.या सगळ्यात हेच दिसते की आपल्या खेळण्या बरोबर आपण मोठे होत नाही.आपण कशासाठी रडत आहोत ते फक्त बदलते,पण आपले रडणे तसेच रहाते.आता आपले रडणे   अति आधुनिक झाले आहे. त्याला अनेक नवीन नावं मिळाली आहेत,जसे की,राग,निराशा,नैराश्य,ताण,संताप इत्यादी.
   खेळणी ही आपल्या मनोरंजना साठी असतात.त्यांचा एकच हेतू असतो की ती आपल्या उपयोगी पडावीत .अगदी तुमचे बीच वरील घरापासून ते तुमच्या suv पर्यंत ...प्रत्येक गोष्ट ही तुमचे जीवन आरामदायी होण्यासाठी असते.तुम्ही तुमच्या जवळच्या वस्तू पेक्षा मोठे असतात.तुमच्या मालकीच्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान असतात.तुमच्याकडे असणाऱ्या किंवा येणाऱ्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक महत्वाचे असतात.

    खेळण हे खेळण असतं.खेळणी विकत घ्या,अधिकधीक खेळणी विकत घ्या.पण त्यांना त्याची योग्य जागा द्या.ती फक्त तुमच्या उपयोगासाठी,तुमच्या आरामासाठी आणि तुमच्या मनोरंजना साठी तिथे आहेत.तुमचे मौल्यवान अश्रू त्यासाठी वाया घालवू नका,जरी ते खेळण कितीही महत्वाचे असेल तरी.सगळ्यात महत्वाचे तर तुम्ही आहात.   

Wednesday, August 13, 2014

नातेसंबंध


   आपण जर आपल्या   जीवनात  आनंदी आहोत म्हणजे  त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही चालले आहे ते बरोबर आहे,योग्य आहे.तर त्याचा अर्थ असा होतो की,जी नाती आपल्याला  महत्वाची वाटतात ती छान चालली आहेत. तसेच आपण आनंदी  नसलो  तर त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही घडतं आहे ते चुकीचे आहे म्हणून आपण  दुःखी आहोत ,तर आपल्याला जी  नाती  महत्वाची वाटतात ती बिघडलेली आहेत.
   नाती ही बी सारखी असतात. त्यांचे नीट संगोपन करावे लागते आणि वाढवावे लागते.अपेक्षा ह्या रानगवता सारख्या असतात त्या त्यांच्या त्या वाढतात.जेव्हा नातेसंबंध दृढ करण्यासाठी पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा नाती सांभाळता येतात. जेव्हा नातेसंबंधा कडे दुर्लक्ष केले जाते,तेव्हा अपेक्षा इतक्या वाढतात की नात्यांची मुळे हलायला लागतात. वाढत्या अपेक्षा ह्या नाती खराब करतात ही आपली समस्या आहे.
   आपण या गोष्टीचा विचार बँकेच्या बचत खात्याचे रूपक घेवून करू या. शिल्लक टाकलेल्या रकमेतीलच पैसे आपण काढू शकतो,पण आपण जेवढी शिल्लक टाकली आहे तितकीच रक्कम आपण काढू शकतो. नातेसंबंधातही तसेच आहे,आपलं नातं तेवढच तयार होईल जेवढी शिल्लक आपण त्यात टाकली आहे.
    नात्यांमध्ये जेव्हा भरपूर भावना गुंतलेल्या असतात तेव्हा चुका समजून घेतल्या जातात,माफही केल्या जातात, अपूर्ण संवाद असेल तरी अर्थ समजून घेतला जातो,आणि तुम्ही कृतीत कमी पडत असाल तरी तुमचा हेतू स्वीकारला जातो. नाती तेव्हाच चांगली राहतात जेव्हा तुम्ही त्या बद्दल चांगला विचार करतात. तुम्ही चांगला विचार करतात कारण तुम्ही नातेसंबंध दृढ करण्यासाठी भावनांची शिल्लक टाकलेली असते.
  काहीवेळेस नाती ही गृहित धरली जातात,कायम स्वरुपाची नाती ही गृहित धरली जातात आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी काहीही केले जात नाही. अपेक्षा सातत्याने वाढत राहतात,पण नातं टिकवण्यासाठी जी गुंतवणूक गरजेची असते ती केली जात नाही. राखून ठेवलेल्या भावना काढून घेतल्या जातात. अशा परिस्थितीत तुमचा प्रत्येक शब्द अपमानास्पद समजला जातो, तुमची प्रत्येक कृती तपासली जाते,शाब्दिक मारामारी आणि आपटणारी दारे ही नियमित घडणारी गोष्ट होते. तुमची कोणतीही कृती स्वीकारली जात नाही आणि तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. अशी नाती म्हणजे खाणीत चालण्यासारख्या असते,जी कधीही धूर सोडते आणि कितीही वेळा धूर सोडते.
     यावरचे उत्तर अगदी साध्यातले साधे आहे.शिल्लक,अधिक शिल्लक आणि खूप अधिक शिल्लक. कोणतेही कार्यशील नाते हे सतत काही तरी मागत असते,पण त्यात आपण नेहमी पुरेशी शिल्लक टाकत असतो.ज्यात तुम्ही तुमचा वेळ त्याच्या वाढीसाठी गुंतवतात.नातेसंबंदहाचे संगोपन  हे गुणवत्तापूर्ण वेळेच्या  गुंतवणूकीने केल्याने होते. ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ द्या. जेव्हा शक्य असेल तेव्हा समजून घेण्यासाठी संवाद साधा. तुमचे प्रेम हे व्यक्त करा आणि ते दाखवा.देण्याचा प्रयत्न करा,पण घेतांना ही आकर्षकपणे घ्या.जेव्हा तुम्ही इतरांचे प्रेम स्वीकारतात तेव्हा तो त्यांच्याबद्दल आदर दाखवण्याचा एक मार्ग असतो,ती मोठी शिल्लक आहे. शिलकी मागे शिल्लक टाकत रहा आणि तुमचे नाते जपा आणि अशा पद्धतीने तुमचा जीवनातला आनंद मिळवा.

   पौराणिक कथेत असं सांगतलं जातं की देवालासुद्धा  नातेसंबंधात समस्या असते. इथे तुम्हांला देवाच्या एक पाउल पुढे जाण्याची संधी आहे.

Thursday, August 7, 2014

शिखर चढायचे ना

शिखर चढायचे ना 
    जेव्हा आपण  वाहन चालविण्याची निवड करतो  , तेव्हा आपल्याला  ट्राफिक जाम स्वीकारला पाहिजे. जेव्हा आपण  आरोग्याबद्दल सतर्क राहण्याची निवड करतो , तेव्हा आपल्याला  जिभेचे चोचले सोडून दिले पाहिजे. अधिक उत्पन्ना बरोबरीने उत्पन्न करही येतोच.
   जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची निवड केली की त्याबरोबर त्या गोष्टीचे स्वाभाविक अशा  सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ही येतात.मुर्खा सारखे दुसरीकडे कशाला शोधायचे,आता हेच बघा ना प्रत्येक गुलाबाला काटे हे असतातच.जेव्हा तुम्ही नाण्याची एक बाजू निवडतात, तेव्हा तुम्हांला दुसरी बाजूही निवडावीच लागते.संकटाशिवाय चे सुखकारक जीवनाबद्दल विचारू नका.महात्मांनी सुद्धा संकटाशिवायचे सुखकारक आयुष्य स्वीकारले नाही.असे जीवन कधीच नसते.
   महत्वकांक्षा जेवढी मोठी तेवढ्या मोठ्या अडचणी येतील.पण तुम्ही  फक्त चालायचे ठरवले तर  तुमच्या अडचणी कमी होतील .जेव्हा तुम्ही माराथोन मध्ये धावाण्याचे ठरवतात  तेव्हा साहजिकपणे  तुम्हांला अधिक अडचणींशी सामना करावा लागतो. जेव्हा तुम्हांला केवळ जगायचे असते,तेव्हा तुम्हांला फार कमी अडचणींना तोंड द्यावे लागते. जेव्हा तुम्हांला तुमच्या क्षमतेनुसार विशिष्ट योग्यतेने जीवन जगायचे असते तेव्हा तुम्हांला अधिक मोठ्या अडचणीं सोडवाव्या लागतात. जेव्हा काठीची एक बाजू तुम्ही वर उचलतात तेव्हा तुम्ही  काठीचे दुसरे टोकही आपोआपच उचलत असतात.  शिखरावर जाण्याचा कोणताही मार्ग सोपा नाही आणि जे गेले आहेत त्यांनीही ते सोपे केले नाही.शेवटी इतिहास वाचणारे आणि इतिहास रचणारे यांच्यात फरक असतोच.
   बायबलच्या अभ्यास गटात ते मालची (malachi)३.३ वाचत होते,” तो चांदी शुद्ध करणारा मनुष्य म्हणून बसला होता.” म्हणजे त्याच्यात देवाचे कोणते गुण आणि स्वभाव असणार आहे?त्या आठवड्यात एका महिलेची भेट ठरली होती ,तिला त्याला रौप्यकार म्हणून पहायचे होते.जेव्हा तिने त्याला काम करतांना पहिले तेव्हा त्याने  चांदीचा तुकडा आगीवर ठेवला आणि त्याला गरम करत ठेवले. त्याने तिला समजावले की चांदीचा तुकडा तोपर्यंत आगीच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा,जोपर्यंत त्याच्यातील अशुद्धता जळून जात नाही.ती म्हणाली असं असेल तर त्याला सगळा वेळ त्या आगी समोर बसून रहावं लागेल. तो म्हणाला हे खरं आहे पण त्याला केवळ आगी समोर नुसतं बसून रहावं लागत नाही तर त्याला त्या चांदीच्या तुकड्यावर सतत नजरही ठेवावी लागते.जर चांदी थोड्यावेळ जास्त जर त्या आगीत राहिली तर ती नाहीशी होईल.तिचा नाश होईल.मग त्या महिलेने विचारले,” मग तुला कसे कळते की चांदी पूर्ण शुद्ध झाली आहे ते?” तो हसला आणि म्हणाला,”ते तर खूप सोपे आहे,....जेव्हा मी त्यात माझी प्रतिमा पाहतो.”
    जर तुम्हांला जीवनाची उष्णता जाणवत असेल,तेव्हा लक्षात ठेवा   देवाची तुमच्यावर नजर आहे आणि तो बघतोय त्याची प्रतिमा त्याला तुमच्यात कधी दिसते ते.प्रत्येक व्यक्ती मध्ये एक प्रेषित झोपलेला असतो.देव माणूस होतो ,म्हणून माणूस परत देव होवू शकतो.जीवन ही काही अशी भट्टी नाही जी तुम्हांला जाळते ,तर जीवन ही अशी भट्टी आहे जी तुम्हांला चमकणाऱ्या चांदीत बदलवते.

   

Wednesday, August 6, 2014

आज

आज “ ही आपल्याला मिळालेली मौल्यवान भेट
   एखादी  वस्तू कोणी आपल्याला दिली आणि त्या  मागचे हृद्य आपल्याला  ओळखता आले  तर ती वस्तू एक आठवणीत राहिल अशी  भेट ठरते.मग ती एखादी साधी वस्तू का असेना? पण वस्तू देण्यामागच्या भावना आपल्याला समजल्या नाही तर  ती निव्वळ एक वस्तू राहते.
   बालपणात मिळालेले एखादे पेन ही आपल्यासाठी महत्वाची  भेट ठरते जेव्हा आपण त्यामागचे ह्र्दय समजून घेतो.मग आपण  म्हणतो की,  हे पेन मला माझ्या बालपणातच मिळालेली भेट  आहे.”तेव्हा आपण आपल्या  पालकांचे आपल्या  संगोपनातले  हृद्य समजून घेत असतो. जेव्हा   आपले  शिक्षक आपल्याला  ज्ञान देत असतात तेव्हा  त्यामागचे हृद्य समजून घेतले तर शिक्षण हे सुद्धा भेट ठरते. आपले  रहाणीमान ही सुद्धा एक भेट ठरते जेव्हा आपण    त्यामागील  कामगाराचे आपल्या  वाढीमधील कष्ट  समजून घेतो . आपल्या संस्थेची वाढ ही सुद्धा एक भेट असते जेव्हा आपण  आपल्या बरोबर  काम करणाऱ्या सहकाऱ्याचे   प्रयत्ना जाणतो.
   आपल्याला मिळालेली भेट ही केवळ वस्तू  नसते तर, एक दृष्टीकोन असतो ,ज्याने त्या वस्तू मागच्या  हृदयाकडे बघता येते.
    या दृष्टीने विचार केला तर “आज” ही  एक शाश्वत भेट आहे.विशेषतः ज्यावेळी   भेट वस्तूंसाठी अनेक स्त्रोत उपलब्ध असतांना,” आज” ही  अशी मौल्यवान भेट आहे जी केवळ आपल्याला  एका नैसर्गिक शक्ती  कडूनच मिळते किंवा तीच शक्ती तुम्हांला सांगते की तुम्ही “काल”  जिवंत होता. काल झोपलेला प्रत्येकजण आज सकाळी उठतोच असं नाही.वस्तुस्थिती अशी असते की काही शक्ती विचार करतात की,तुम्ही अजून एक “आज” साठी महत्वाचे आहात.आपल्याला मिळालेल्या त्या मौल्यवान २४ तासांच्या मागील निसर्गाचे  हृद्य ओळखा. भेटवस्तूचा दुरुपयोग करणे म्हणजे ती भेट देणाऱ्याशी गैरवर्तन करण्यासारखे आहे हे लक्षात घ्या.“आज” ही निर्मिकाने दिलेली  देणगी आहे हे माहित करून घ्या.जेव्हा आपण  एखाया भेटवस्तूचे मूल्य समजून घेतो ,तेव्हाच त्या भेटीचे मूल्य आपल्याला  जाणवते . “आज”चे मूल्य  समजून घेवून तो अधिक मौल्यवान करू या.
   आज आपण  आपल्या  जीवनातल्या  एक दिवसाचा व्यापार केला  तर त्यासाठी आपल्याला  परत काय मिळेल?. म्हणून आपला  आज शक्य तितका  अधिक उत्पादनक्षम  करा.” आज” हा आपल्या  उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे.म्हणून आपल्या  भूतकाळावर रेघ मारा,विश्वास ठेवा की काल हा कालच संपला, आणि आपल्या  वेगाने  भविष्याचे बटन दाबा. आज आपण  भूतकाळातील दोषांची काळजी करायची नाही ,त्याचा आपल्या  भविष्यातील अनिश्चिते वर  काही परिणाम होणार नाही,तर तो “आज”तो दिवस आहे,ती एक संधी आहे,आणि आयुष्याचा एक भाग आहे.म्हणून आपल्या  “आज” ची काळजी घेतली तर  मग आपल्या  जीवनाची काळजी आपोआपच घेतली जाईल.हो ना?

      बुद्ध म्हणतो,” चला उठा आणि आभार माना, ते यासाठी जर तुम्ही आज जास्त  शिकला नाही,तर  तुम्ही थोडेसे तरी  काही शिकला असाल  आणि जर तुम्ही थोडेही शिकू शकला नसाल,पण  तुम्ही आजारी झाला नाहीत आणि जर  आजारी झालात  पण तुम्ही मेला नाहीत,म्हणून  चला तर या सगळ्यासाठी आभार माना, आणि कृतज्ञ रहा.