Monday, August 25, 2014

मार्गदर्शन करण्यापेक्षा आदर करणे अधिक गरजेचे आहे.



   मालकी दाखविण्याचे शिकण्याआधी तिला  शेअर करण्यास सांगितले होते. जेव्हा ती पाच वर्षाची होती तेव्हा तिला तिच्या दोन वर्षाच्या भावासाठी त्याग करण्यास सांगितले होते.ती स्वतःच लहान होती,पण तिचे पालक तिच्याकडून जबाबदार बहिणीच्या भूमिकेची  अपेक्षा करत होते. तीस वर्षा नंतर तिला तिचे कुटुंब होते तसेच तिच्या भावाचेही होते.तरी ती स्वतःला भावाच्या बाबतीत जबाबदार समजत होती. तरी ती त्याला उपदेश करत असे,जेव्हा त्याच्या लग्नात काही तरंग उमटायचे तेव्हा ती त्यांच्या मध्ये पडायची,भावाच्या बायकोला मुलाला कसं खायला घालायचं हे सांगायची,मुलांना कसं वाढवायचं हे सांगायची.ती अजून सुद्धा त्याग करायची,पण तिला परत काय मिळत होते? बेपर्वाईच्या  वागणुकी बरोबर तिला मिळत होते हृदयविकार,झोपेविना रात्री आणि भरपूर अश्रू .का? खरं तर  तिचा भाऊ स्वतःचे निर्णय घेण्या इतका मोठा आहे.जरी त्याचे काही निर्णय चुकीचे होते तरी त्याला असे वाटत होते की त्याला अशा चुका करण्याचा हक्क आहे,त्याला वाटायचे की या चुकण्यातूनच तो शिकणार आहे. तिच्या वहिनीला तिची म्हणजे ताईची /नणंदेची  कुटुंबातील ढवळाढवळ आवडत नव्हती. तिचा असा विश्वास होता की तिला तिच्या मुलांना स्वतःच्या मताने वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणी केवळ वयाने मोठे आहे म्हणून उपदेश करत असतील तर ती त्यांचा तिरस्कार करेल.
   पहिला शब्द बोलण्यापासून,पहिला शब्द लिहता येण्यापासून आणि पाहिलं पाउल टाकण्यापासून ...त्याच्या वडिलांचा त्यात महत्वाचा सहभाग होता.मुलासाठी त्याचे वडिल नेहमीच सुपरमन होते,तेच त्याचे हिरो होते आणि त्यांच्याशीच तो स्पर्धा करू इच्छित होता. मुलाला करीयर समुपदेशन सुद्धा वडीलच करत होते.मुलाला त्यांच्या घराण्यातील पहिला उद्योजक व्हायचं होतं आणि तिथेही त्याचे वडीलच त्याला मार्गदर्शन करते होते. आज मुलगा प्रसिद्ध उद्योजक आहे.आजही वडिल तो रात्री घरी आली की कामावर काय झाले हे विचारतात आणि सूचना करतात ,पण यामुळे मुलाला त्यांचे भय वाटते.त्याला असे वाटते की वडिलांनी त्याला अधिक अवकाश दिला पाहिजे. वडिल काहीसे निराश झाले आहेत कारण त्यांना मुलाकडून हवं तसं लक्ष दिलं जात नाही असे वाटते. त्यांना वाटते की,मुलाला आता त्यांची गरज नाही.याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आहे,ते लवकर म्हातारे व्हायला लागले आहेत.
तुम्ही एखाद्याची नेहमी बहिण असतात,पण तुम्ही कायम बहिणीची भूमिका करू शकत नाही.तुम्ही कायमच प्रेमळ पालक असतात,पण कायम तीच भूमिका घेतली पाहिजे असं नाही.एका बिंदू नंतर कोणीही तुमचा पवित्र दृष्टीकोन स्वीकारू शकत नाही.
     तीन वर्षाचे मुल एका विशिष्ट सन्मानाची अपेक्षा करते आणि त्याला त्याच प्रकारच्या आदराची गरज असते. तीन वर्षाच्या मुलीला हवे असणारे कपडे घालू दिले नाही तर तिला वाटते की तिचा कोणी आदर करत नाही.दहा वर्षाचे मुल स्वतः मेनूकार्ड वाचून ऑर्डर देवू इच्छितो.तिच त्याला आदर देण्याची कल्पना असते. टीनएजर म्हणून तिला तिच्या मैत्रिणीची निवड करायची असते,आणि पालकांनी तशी करू देणे म्हणजे तिचा आदर करणे होय. त्याने तुमच्या बरोबर काही वर्षे काम केले ,त्याला स्वतःला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्याच्या निर्णयावर खूष आहात ,ही कृतीच त्याच्यासाठी आदर दाखविण्याची आहे.प्रत्येक वयाला आणि जीवनाच्या प्रत्येक घडीला आदर जोडलेला असतो आणि  तुम्ही तो दाखविण्याची गरज असते.
     एखाद्याला मार्गदर्शन करण्याचा,विशेषतः कोणी न मागता सुद्धा मार्गदर्शन करण्याचा हेतू जरी चांगला असला,तरी त्या व्यक्तीला तिचा आदर केला जात नाही असं वाटण्याची शक्यता असते. आपला आदर करावा याची गरज ही मार्गदर्शन करावे यापेक्षा अधिक असते.

   इतरांचा आपण आदर करत आहोत....ही  तुमची निवड  असू द्या..ते तुमचे मार्गदर्शन घेतील.......ती त्यांची निवड असू द्या.

No comments:

Post a Comment