Wednesday, August 6, 2014

आज

आज “ ही आपल्याला मिळालेली मौल्यवान भेट
   एखादी  वस्तू कोणी आपल्याला दिली आणि त्या  मागचे हृद्य आपल्याला  ओळखता आले  तर ती वस्तू एक आठवणीत राहिल अशी  भेट ठरते.मग ती एखादी साधी वस्तू का असेना? पण वस्तू देण्यामागच्या भावना आपल्याला समजल्या नाही तर  ती निव्वळ एक वस्तू राहते.
   बालपणात मिळालेले एखादे पेन ही आपल्यासाठी महत्वाची  भेट ठरते जेव्हा आपण त्यामागचे ह्र्दय समजून घेतो.मग आपण  म्हणतो की,  हे पेन मला माझ्या बालपणातच मिळालेली भेट  आहे.”तेव्हा आपण आपल्या  पालकांचे आपल्या  संगोपनातले  हृद्य समजून घेत असतो. जेव्हा   आपले  शिक्षक आपल्याला  ज्ञान देत असतात तेव्हा  त्यामागचे हृद्य समजून घेतले तर शिक्षण हे सुद्धा भेट ठरते. आपले  रहाणीमान ही सुद्धा एक भेट ठरते जेव्हा आपण    त्यामागील  कामगाराचे आपल्या  वाढीमधील कष्ट  समजून घेतो . आपल्या संस्थेची वाढ ही सुद्धा एक भेट असते जेव्हा आपण  आपल्या बरोबर  काम करणाऱ्या सहकाऱ्याचे   प्रयत्ना जाणतो.
   आपल्याला मिळालेली भेट ही केवळ वस्तू  नसते तर, एक दृष्टीकोन असतो ,ज्याने त्या वस्तू मागच्या  हृदयाकडे बघता येते.
    या दृष्टीने विचार केला तर “आज” ही  एक शाश्वत भेट आहे.विशेषतः ज्यावेळी   भेट वस्तूंसाठी अनेक स्त्रोत उपलब्ध असतांना,” आज” ही  अशी मौल्यवान भेट आहे जी केवळ आपल्याला  एका नैसर्गिक शक्ती  कडूनच मिळते किंवा तीच शक्ती तुम्हांला सांगते की तुम्ही “काल”  जिवंत होता. काल झोपलेला प्रत्येकजण आज सकाळी उठतोच असं नाही.वस्तुस्थिती अशी असते की काही शक्ती विचार करतात की,तुम्ही अजून एक “आज” साठी महत्वाचे आहात.आपल्याला मिळालेल्या त्या मौल्यवान २४ तासांच्या मागील निसर्गाचे  हृद्य ओळखा. भेटवस्तूचा दुरुपयोग करणे म्हणजे ती भेट देणाऱ्याशी गैरवर्तन करण्यासारखे आहे हे लक्षात घ्या.“आज” ही निर्मिकाने दिलेली  देणगी आहे हे माहित करून घ्या.जेव्हा आपण  एखाया भेटवस्तूचे मूल्य समजून घेतो ,तेव्हाच त्या भेटीचे मूल्य आपल्याला  जाणवते . “आज”चे मूल्य  समजून घेवून तो अधिक मौल्यवान करू या.
   आज आपण  आपल्या  जीवनातल्या  एक दिवसाचा व्यापार केला  तर त्यासाठी आपल्याला  परत काय मिळेल?. म्हणून आपला  आज शक्य तितका  अधिक उत्पादनक्षम  करा.” आज” हा आपल्या  उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे.म्हणून आपल्या  भूतकाळावर रेघ मारा,विश्वास ठेवा की काल हा कालच संपला, आणि आपल्या  वेगाने  भविष्याचे बटन दाबा. आज आपण  भूतकाळातील दोषांची काळजी करायची नाही ,त्याचा आपल्या  भविष्यातील अनिश्चिते वर  काही परिणाम होणार नाही,तर तो “आज”तो दिवस आहे,ती एक संधी आहे,आणि आयुष्याचा एक भाग आहे.म्हणून आपल्या  “आज” ची काळजी घेतली तर  मग आपल्या  जीवनाची काळजी आपोआपच घेतली जाईल.हो ना?

      बुद्ध म्हणतो,” चला उठा आणि आभार माना, ते यासाठी जर तुम्ही आज जास्त  शिकला नाही,तर  तुम्ही थोडेसे तरी  काही शिकला असाल  आणि जर तुम्ही थोडेही शिकू शकला नसाल,पण  तुम्ही आजारी झाला नाहीत आणि जर  आजारी झालात  पण तुम्ही मेला नाहीत,म्हणून  चला तर या सगळ्यासाठी आभार माना, आणि कृतज्ञ रहा.

No comments:

Post a Comment