Thursday, August 14, 2014

तुमचे महत्व

.तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंपेक्षा तुम्ही स्वतः जास्त महत्वाचे आहात.

   पती त्याच्या पत्नीला तिच्या वाढदिवसा निमित्ताने एक कार भेट देतो. तो प्रथम तिच्या हातात गाडीच्या किल्ला देतो,नंतर एक पाउच ज्यात आवश्यक कागदपत्र असतात,जसे ड्रायव्हिंग लायसन असते,आणि हे सगळे दिल्यांनतर तो तिला मिठीत घेतो.नंतर तिला लॉंग ड्राईव्हला जायला सांगतो आणि त्याच बरोबर मुलांची काळजी घ्यायला सांगतो.ती त्याला कीस करून आभार मानते आणि कार घेवून ती जाते.एखाद्या किलोमीटर जात नाही तर कशाला तरी जाऊन धडकते. ती सुरक्षित असते पण गाडीला पोचा पडतो.तिला सारखे अपराधी वाटत असते की,ती आता त्याला काय सांगायचे?तो हे सगळं कसं घेईल? विचार आणि भावना ह्या माठेफिरुसारख्या धावत असतात.पोलिस अपघाताच्या जागी लगेच येतात.” आम्ही तुमचे लायसन बघू शकतो का? असं म्हणत ते लायसन मागतात.तिचे हात थरथरत असतात,ती त्या पाऊच पर्यंत जाते जे तिच्या नवऱ्याने तिला दिले होते.तिच्या गालावरून अश्रू ओघळत असतात,ती पाऊच मधून जेव्हा लायसन बाहेर काढत असते तेव्हा तिला त्या पाऊच मध्ये एक नवऱ्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी सापडते.त्यात लिहलेले असते,”प्रिये,जर कधी अपघात झाला तर लक्षात ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो कार वर नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे.”
   आशीर्वाद तेच देतात जे समजतात की ते माणसांवर प्रेम करतात वस्तूंवर नाही,आणि आवडत्या वस्तूंना आणि उपयोगी माणसांना आशीर्वाद दिले जात नाही.
   कारवरचा एखादा ओरखडा आपले ब्लड प्रेशर वर नेतो ...पण आपल्याला असे वाटत नाही की आपलं मनच आपल्या हृदयावर ओरखडे मारत आहे. मला असा माणूस माहित आहे ज्याने  त्याला आवडणारी वस्तू  हेतुपूर्वक जमिनीवर फेकली  आणि नंतर म्हटले की,” अठरा वर्षापासून ही वस्तू मला ताण देत आहे.मी सारखा विचार करायचो की, –जर ही वस्तू  पडली तर,जर ती मोडली तर....म्हणून मग मला  वाटले  की ,कोण बॉस आहे हे दाखवून देण्याची  आता वेळ आली आहे आणि त्यामुळे मनाला शांतता तरी मिळेल.” 
मला असाही  एक माणूस माहित आहे ज्याने त्याच्या  मर्सिडीज बेन्जचा अपघातात पार चक्काचूर झाला म्हणून पार्टी ठेवली होती.तो म्हणाला,जरी माझी कार पूर्ण खराब झाली तरी मला त्याचे काही विशेष वाटत नाही,कारण गाडीत कोणीच नव्हते. आता मी एकदम व्यवस्थित असल्याने दुसरी कार घेवू शकतो,पण जर कार नीट राहिली असती आणि मीच गेलो असतो तर ---ती गोष्ट योग्य झाली नसती.
      आपलं जीवन ६०रु.च्या कारने सुरु होतं,जेव्हा ती मोडते तेव्हा आपण भोकाड पसरतो .नंतर आपण २००० रु. रिमोट कंट्रोल कार घेण्या इतके मोठे होतो,आणि जेव्हा ती कार खराब होते तेव्हा आपण रडतो.नंतर आपल्याला २०,००० रुपयाची बँटरीवर चालणारी कार भेट मिळते. जेव्हा ती काम करायचे थांबते,तेव्हा आपण निराश होतो.नंतर ४ लाखाची कार येते,मग २२लाखाची सुव ,नंतर ८६ लाखाची लक्झरी सदन....आणि प्रत्येक वेळेला मशीन बरोबर काहीतरी होते,कधी ओरखडा,कधी पोचा.आपल्या तणावाचा आणि चिंताचा पारा वर चढत च जातो.या सगळ्यात हेच दिसते की आपल्या खेळण्या बरोबर आपण मोठे होत नाही.आपण कशासाठी रडत आहोत ते फक्त बदलते,पण आपले रडणे तसेच रहाते.आता आपले रडणे   अति आधुनिक झाले आहे. त्याला अनेक नवीन नावं मिळाली आहेत,जसे की,राग,निराशा,नैराश्य,ताण,संताप इत्यादी.
   खेळणी ही आपल्या मनोरंजना साठी असतात.त्यांचा एकच हेतू असतो की ती आपल्या उपयोगी पडावीत .अगदी तुमचे बीच वरील घरापासून ते तुमच्या suv पर्यंत ...प्रत्येक गोष्ट ही तुमचे जीवन आरामदायी होण्यासाठी असते.तुम्ही तुमच्या जवळच्या वस्तू पेक्षा मोठे असतात.तुमच्या मालकीच्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान असतात.तुमच्याकडे असणाऱ्या किंवा येणाऱ्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक महत्वाचे असतात.

    खेळण हे खेळण असतं.खेळणी विकत घ्या,अधिकधीक खेळणी विकत घ्या.पण त्यांना त्याची योग्य जागा द्या.ती फक्त तुमच्या उपयोगासाठी,तुमच्या आरामासाठी आणि तुमच्या मनोरंजना साठी तिथे आहेत.तुमचे मौल्यवान अश्रू त्यासाठी वाया घालवू नका,जरी ते खेळण कितीही महत्वाचे असेल तरी.सगळ्यात महत्वाचे तर तुम्ही आहात.   

No comments:

Post a Comment