Thursday, August 7, 2014

शिखर चढायचे ना

शिखर चढायचे ना 
    जेव्हा आपण  वाहन चालविण्याची निवड करतो  , तेव्हा आपल्याला  ट्राफिक जाम स्वीकारला पाहिजे. जेव्हा आपण  आरोग्याबद्दल सतर्क राहण्याची निवड करतो , तेव्हा आपल्याला  जिभेचे चोचले सोडून दिले पाहिजे. अधिक उत्पन्ना बरोबरीने उत्पन्न करही येतोच.
   जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची निवड केली की त्याबरोबर त्या गोष्टीचे स्वाभाविक अशा  सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ही येतात.मुर्खा सारखे दुसरीकडे कशाला शोधायचे,आता हेच बघा ना प्रत्येक गुलाबाला काटे हे असतातच.जेव्हा तुम्ही नाण्याची एक बाजू निवडतात, तेव्हा तुम्हांला दुसरी बाजूही निवडावीच लागते.संकटाशिवाय चे सुखकारक जीवनाबद्दल विचारू नका.महात्मांनी सुद्धा संकटाशिवायचे सुखकारक आयुष्य स्वीकारले नाही.असे जीवन कधीच नसते.
   महत्वकांक्षा जेवढी मोठी तेवढ्या मोठ्या अडचणी येतील.पण तुम्ही  फक्त चालायचे ठरवले तर  तुमच्या अडचणी कमी होतील .जेव्हा तुम्ही माराथोन मध्ये धावाण्याचे ठरवतात  तेव्हा साहजिकपणे  तुम्हांला अधिक अडचणींशी सामना करावा लागतो. जेव्हा तुम्हांला केवळ जगायचे असते,तेव्हा तुम्हांला फार कमी अडचणींना तोंड द्यावे लागते. जेव्हा तुम्हांला तुमच्या क्षमतेनुसार विशिष्ट योग्यतेने जीवन जगायचे असते तेव्हा तुम्हांला अधिक मोठ्या अडचणीं सोडवाव्या लागतात. जेव्हा काठीची एक बाजू तुम्ही वर उचलतात तेव्हा तुम्ही  काठीचे दुसरे टोकही आपोआपच उचलत असतात.  शिखरावर जाण्याचा कोणताही मार्ग सोपा नाही आणि जे गेले आहेत त्यांनीही ते सोपे केले नाही.शेवटी इतिहास वाचणारे आणि इतिहास रचणारे यांच्यात फरक असतोच.
   बायबलच्या अभ्यास गटात ते मालची (malachi)३.३ वाचत होते,” तो चांदी शुद्ध करणारा मनुष्य म्हणून बसला होता.” म्हणजे त्याच्यात देवाचे कोणते गुण आणि स्वभाव असणार आहे?त्या आठवड्यात एका महिलेची भेट ठरली होती ,तिला त्याला रौप्यकार म्हणून पहायचे होते.जेव्हा तिने त्याला काम करतांना पहिले तेव्हा त्याने  चांदीचा तुकडा आगीवर ठेवला आणि त्याला गरम करत ठेवले. त्याने तिला समजावले की चांदीचा तुकडा तोपर्यंत आगीच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा,जोपर्यंत त्याच्यातील अशुद्धता जळून जात नाही.ती म्हणाली असं असेल तर त्याला सगळा वेळ त्या आगी समोर बसून रहावं लागेल. तो म्हणाला हे खरं आहे पण त्याला केवळ आगी समोर नुसतं बसून रहावं लागत नाही तर त्याला त्या चांदीच्या तुकड्यावर सतत नजरही ठेवावी लागते.जर चांदी थोड्यावेळ जास्त जर त्या आगीत राहिली तर ती नाहीशी होईल.तिचा नाश होईल.मग त्या महिलेने विचारले,” मग तुला कसे कळते की चांदी पूर्ण शुद्ध झाली आहे ते?” तो हसला आणि म्हणाला,”ते तर खूप सोपे आहे,....जेव्हा मी त्यात माझी प्रतिमा पाहतो.”
    जर तुम्हांला जीवनाची उष्णता जाणवत असेल,तेव्हा लक्षात ठेवा   देवाची तुमच्यावर नजर आहे आणि तो बघतोय त्याची प्रतिमा त्याला तुमच्यात कधी दिसते ते.प्रत्येक व्यक्ती मध्ये एक प्रेषित झोपलेला असतो.देव माणूस होतो ,म्हणून माणूस परत देव होवू शकतो.जीवन ही काही अशी भट्टी नाही जी तुम्हांला जाळते ,तर जीवन ही अशी भट्टी आहे जी तुम्हांला चमकणाऱ्या चांदीत बदलवते.

   

No comments:

Post a Comment