Friday, August 29, 2014

जीवनातला वेषांतर केलेला शिक्षक "अनुभव"


   जीवनात समोर येणाऱ्या अनुभवांच्या एक पाउल अलिकडेच आपली परिपक्वता असते.आपल्यात परिपक्वता यावी हाच अनुभवांचा  खरा हेतू असतो.पण प्रत्येक अनुभवाबरोबर आपली समज वाढत जाते आणि त्या बरोबर आपल्या समोरील आव्हानेही वाढतात.अशा प्रकारे आपल्या जीवनाची वाढ ही नागमोडी वळणे घेत होत असते.
  तुम्ही किती ज्ञानी आहात,तुम्ही किती जीवन पाहिलं आहे,किवा तुम्ही जे करतात त्यात किती उत्तम आहात,एवढेच नाही तर तुम्ही जीवनाचा ज्ञानकोश आहात हे फार महत्वाचे नाही...कारण असं असलं तरी जीवनातल्या कोणत्यातरी कोपऱ्यावर मंदी,पडणे,कोसळणे हिंडत असते.जीवन नेहमी आपला प्रवाह,ताल बिघडविण्याचा प्रयत्न  करत असते.
    पण नेहमी आपली झालेली  वाढ लक्षात ठेवा, दहावीत नापास होण्याचे अपयश हे आठवीत पास झाल्यापेक्षा अधिक आहे.माउंट एव्हरेस्ट चढण्याची एक संधी हुकली तर स्थानिक डोंगरावर चढणे सुद्धा कमी दर्जाचे समजले जाते.जेवढी उच्च परिपक्वता तेवढी अधिक आव्हाने.जीवन व्यक्तीला असेच मोल्ड /साच्यात बसवत तयार करत असते.
  जीवन हा असा प्रवास नाही जो दोन पाऊले पुढे आणि एक पाऊल मागे येते. असे तेव्हाच होते जेव्हा माणूस जाणीवेशिवाय जगत असतो,आणि त्याच्या अनुभवातून तो काहीच शिकत नाही.माणसाची जाणीवच त्याला प्रत्येक अनुभवातून शिकण्याचे प्रशिक्षण देते,जरी तो स्प्रिग च्या कापडावर खाली वर होत असला तरी तो प्रत्येक पडण्यानंतर परत उठतो आणि परत पडतो आणि उठतो..पण प्रत्येक पडण्यानंतर अधिक वर उठतो. नंतरच्या प्रत्येक वरच्या पाउलागणिक त्याची परिपक्वता आणि त्याच्या आव्हानांची पातळी या दोन्हीत वाढ होते.
   आपल्या  यशाचे कारण काय?”चांगला निर्णय” ,चांगला निर्णय घ्यायला आपल्याला  का शक्य झालं?जीवनातल्या अनुभवांमुळे “तुम्ही जीवनातल्या अनुभवांकडून कसा लाभ करून घेतला? “वाईट निर्णय” घेवून.मी या अनुभवांना स्प्रिंगवरच्या कपड्यावरचे अनुभव समजते.
जीवनातल्या स्प्रिंगच्या कपड्यावरचे अनुभवावर,मी प्रत्येक अनुभवागणिक वाढत गेले..प्रत्येक अनुभव मला काय हवे ते देत गेला किंवा त्याने मला काय नको याची जाणीव करून दिली.

  नंतरच्या वेळेला आपल्याला  मिळालेले अपयश हे आपल्याला   अस्वस्थ करते पण आपण हे लक्षात ठेवायला हवे की  ,जीवनाने आपल्याला  दिलेला अनुभव हा वेषांतर केलेला शिक्षक आहे.,आपल्यातील  परिपक्वता वाढवण्यास मदत करण्यासाठी तो येतो.आपल्याला झालेली जाणीव  त्या अनुभवातून आपली परिपक्वताच वाढविण्यासच  फक्त मदत करत नाही तर अधिक उच्च आव्हाना साठी तयार होण्यास सांगते..आपल्या सारख्या मर्त्य लोकांना पडणे आणि उभे रहाणे  हा आशीर्वाद आहे कारण त्यामुळे आपल्या प्रत्येक उभे रहाण्यातून थोडे वर जात असतो.  

No comments:

Post a Comment