Wednesday, August 13, 2014

नातेसंबंध


   आपण जर आपल्या   जीवनात  आनंदी आहोत म्हणजे  त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही चालले आहे ते बरोबर आहे,योग्य आहे.तर त्याचा अर्थ असा होतो की,जी नाती आपल्याला  महत्वाची वाटतात ती छान चालली आहेत. तसेच आपण आनंदी  नसलो  तर त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही घडतं आहे ते चुकीचे आहे म्हणून आपण  दुःखी आहोत ,तर आपल्याला जी  नाती  महत्वाची वाटतात ती बिघडलेली आहेत.
   नाती ही बी सारखी असतात. त्यांचे नीट संगोपन करावे लागते आणि वाढवावे लागते.अपेक्षा ह्या रानगवता सारख्या असतात त्या त्यांच्या त्या वाढतात.जेव्हा नातेसंबंध दृढ करण्यासाठी पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा नाती सांभाळता येतात. जेव्हा नातेसंबंधा कडे दुर्लक्ष केले जाते,तेव्हा अपेक्षा इतक्या वाढतात की नात्यांची मुळे हलायला लागतात. वाढत्या अपेक्षा ह्या नाती खराब करतात ही आपली समस्या आहे.
   आपण या गोष्टीचा विचार बँकेच्या बचत खात्याचे रूपक घेवून करू या. शिल्लक टाकलेल्या रकमेतीलच पैसे आपण काढू शकतो,पण आपण जेवढी शिल्लक टाकली आहे तितकीच रक्कम आपण काढू शकतो. नातेसंबंधातही तसेच आहे,आपलं नातं तेवढच तयार होईल जेवढी शिल्लक आपण त्यात टाकली आहे.
    नात्यांमध्ये जेव्हा भरपूर भावना गुंतलेल्या असतात तेव्हा चुका समजून घेतल्या जातात,माफही केल्या जातात, अपूर्ण संवाद असेल तरी अर्थ समजून घेतला जातो,आणि तुम्ही कृतीत कमी पडत असाल तरी तुमचा हेतू स्वीकारला जातो. नाती तेव्हाच चांगली राहतात जेव्हा तुम्ही त्या बद्दल चांगला विचार करतात. तुम्ही चांगला विचार करतात कारण तुम्ही नातेसंबंध दृढ करण्यासाठी भावनांची शिल्लक टाकलेली असते.
  काहीवेळेस नाती ही गृहित धरली जातात,कायम स्वरुपाची नाती ही गृहित धरली जातात आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी काहीही केले जात नाही. अपेक्षा सातत्याने वाढत राहतात,पण नातं टिकवण्यासाठी जी गुंतवणूक गरजेची असते ती केली जात नाही. राखून ठेवलेल्या भावना काढून घेतल्या जातात. अशा परिस्थितीत तुमचा प्रत्येक शब्द अपमानास्पद समजला जातो, तुमची प्रत्येक कृती तपासली जाते,शाब्दिक मारामारी आणि आपटणारी दारे ही नियमित घडणारी गोष्ट होते. तुमची कोणतीही कृती स्वीकारली जात नाही आणि तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. अशी नाती म्हणजे खाणीत चालण्यासारख्या असते,जी कधीही धूर सोडते आणि कितीही वेळा धूर सोडते.
     यावरचे उत्तर अगदी साध्यातले साधे आहे.शिल्लक,अधिक शिल्लक आणि खूप अधिक शिल्लक. कोणतेही कार्यशील नाते हे सतत काही तरी मागत असते,पण त्यात आपण नेहमी पुरेशी शिल्लक टाकत असतो.ज्यात तुम्ही तुमचा वेळ त्याच्या वाढीसाठी गुंतवतात.नातेसंबंदहाचे संगोपन  हे गुणवत्तापूर्ण वेळेच्या  गुंतवणूकीने केल्याने होते. ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ द्या. जेव्हा शक्य असेल तेव्हा समजून घेण्यासाठी संवाद साधा. तुमचे प्रेम हे व्यक्त करा आणि ते दाखवा.देण्याचा प्रयत्न करा,पण घेतांना ही आकर्षकपणे घ्या.जेव्हा तुम्ही इतरांचे प्रेम स्वीकारतात तेव्हा तो त्यांच्याबद्दल आदर दाखवण्याचा एक मार्ग असतो,ती मोठी शिल्लक आहे. शिलकी मागे शिल्लक टाकत रहा आणि तुमचे नाते जपा आणि अशा पद्धतीने तुमचा जीवनातला आनंद मिळवा.

   पौराणिक कथेत असं सांगतलं जातं की देवालासुद्धा  नातेसंबंधात समस्या असते. इथे तुम्हांला देवाच्या एक पाउल पुढे जाण्याची संधी आहे.

No comments:

Post a Comment