Tuesday, April 27, 2021

  जॉर्ज ऑर्वेलची पुस्तके आपण सर्वांनी कधी ना कधी वाचली असतील.मला अभ्यासासाठी त्याचे १९८४ हे पुस्तक होते.मग त्याची अजूनही इतर पुस्तके वाचायला हवी म्हणून खूप कष्टाने काही पुस्तके मिळाली होती.त्यात एक होतं ‘Animal Farm’.एखादं पुस्तक किती कालसुसंगत असावं ते हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही.पण आत्ता किंडलवर मी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद वाचला. तो सुरज प्रकाश यांनी केला आहे. या पुस्तकातल्या अनेक गोष्टी आजच्या काळाशी तो जोडता येतात तशा त्या भूतकाळातल्या अनेक घटनांशी सुद्धा जोडता येतात. तुम्ही कोणत्याही देशात रहा आणि कोणीही सत्तेत असो.त्या प्रत्येकाशी साम्य असणाऱ्या गोष्टी आपल्याला या कादंबरीत वाचता येतात. त्यामुळे खूप मजा आली.हिंदी भाषा आपल्याला इंग्रजीच्या मानाने जवळची आहे,आणि आपले सगळे नेते हिंदीत बोलतात मग तर ती समजायला पाहिजेच ना.

आपण सगळेच राजकारणावर बोलत असतो,ते आपल्याला किती कळते हे माहित नसतांना सुद्धा बोलतो.आपल्या समोर जे दिसतं आहे, तेवढंच राजकारण आहे असं आपल्याला वाटत असतं.पण पडद्याच्या मागे काय घडत असतं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते कळत नाही.जेव्हा राजकारणी नेत्यांचे भयंकर प्रकार आपल्याला कळतात तेव्हा आपण सहजपणे त्यांना जनावर संबोधतो.अर्थात प्रत्येकात एक जनावर असतंच.त्याचा भोवताल कसा आहे त्यानुसार ते बाहेर येतं.आपल्या आतल्या जनावराला वळण लावावं लागतं.
बोल्शेविक क्रांती नंतर निर्माण झालेल्या विसंगतीच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आहे. कोरोनाच्या संकट काळात माणसातलं माणूसपण आणि जनावर ओळखण्यास सुद्धा या कादंबरीची मदत होवू शकते.सुरज प्रकाश यांनी हिंदीत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.आपल्या जवळची भाषा असल्याने पुस्तकातला मजकूर आपण सहजपणे आपल्या परिसराशी जोडून घेवू शकतो.अर्थात इंग्लिशमध्ये वाचल्यानेही कळतोच.
गोष्ट अगदी साधी आहे.मिस्टर जॉन यांचे “ Animal farm’ आहे.त्यात सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. घोडे,कुत्री,गायी,उंदीर,बदकं आणि सगळ्यात बुद्धिमान असे डुक्करं. डुक्करामध्ये दोन तरुण डुक्करं आहेत,जे विद्रोहाचे बीज प्राण्यामध्ये पेरतात.सगळे प्राणी एकदिवस बंड करतात आणि त्यांच्या हातात सत्ता येते.त्यांनी त्यांच्यासाठी एक गाणं सुद्धा तयार केलं आहे. सगळे प्राणी स्वप्नात हरवतात.दोन नेते स्नोबॉल आणि नेपोलियन पशुंसाठी सात आज्ञा तयार करतात. जशा की जे दोन पायावर चालतात ते शत्रू आहेत,जे चार पायांवर चालतात आणि ज्यांना पंख आहेत ते मित्र आहेत. कोणताही प्राणी कपडे घालणार नाही,अंथरुणावर झोपणार नाही,दारू पिणार नाही,एकदुसऱ्याला मारणार नाही,सगळे समान आहेत.सत्ता हाती आल्यावर नियम तुटू लागतात. प्राण्याचे नेते स्वतःसाठी नियम वळवून घेतात. सगळे समान आहेत पण काहीजण जास्त समान आहेत म्हणून काहीजणांची पिटाई होते,काहीजणांनी दारू पिली तरी चालते,अंथरुणावर झोपले तरी चालते.सत्तेत बसलेले आपल्या रक्षणासाठी आणि विरोध केला तर त्याला मारण्यासाठी भयंकर कुत्रे पाळतात. अनेक अफवा पसरवल्या जातात जेणेकरून जनता भयभीत होईल आणि सत्तेच्या ताब्यात राहील. शिवाय सत्तेत असलेलं सरकार हे सगळं animal farm माणसापासून/ शत्रूपासून वाचवण्यासाठी करत आहे.हे पटवून दिलं जातं. सगळीकडे सरकार करत असलेल्या कामाचा नुसता बोलबाला असतो.खरं काय आहे हे जनतेला कळू द्यायचं नाही म्हणून अनेक युक्त्या केल्या जातात.
या पुस्तकात फार मजेदार शैलीत विसंगती,विरोधाभास,स्वार्थ दाखवला आहे.त्यामुळे सरकार कोणत्याही पक्षाचं असो,कोणत्याही देशात असो वाचणाऱ्याला त्यातलं साम्य जाणवत रहातं. मनुष्य आणि प्राणी यांच्यातलं अंतर कसं कमी होत जातं, कोण कोणाचं बाजूचं आणि कोणाच्या विरुद्ध हे कळत नाही. नायक कोण आणि खलनायक कोण हे सामान्य माणसाला कळत नाही.
जॉर्ज ऑर्वेल मला त्याच्या लिखाणामुळे खूप आवडतो,म्हणून त्याचं मराठीत आलेलं चरित्र वाचत आहे.मस्त आहे.पुस्तक.
No photo description available.
Manjusha Gadgil, Vandana Khare and 20 others
24 comments
1 share
Like
Comment
Share

24 comments

View 5 more comments

No comments:

Post a Comment