Tuesday, April 27, 2021

  सहज –धनंजय जोशी

सहज म्हणून वाचायला घेतले तरी सहजतेने समजले असे म्हणता येणार नाही,असे पुस्तक वाचायला घेतले. खरं तर या पुस्तकातले लेख लोकमत मध्ये प्रकाशित झालेले आहेत. ते त्याचवेळी मला खूप आवडले होते.याचा अर्थ त्यात लिहलेले मला कळले होते असे अजिबात नाही.किंबहुना प्रत्येक वेळी त्यातल्या गोष्टी वाचल्या की नवीनच काहीतरी कळत जातं.या पुस्तकातल्या गोष्टी या दैनदिन जीवनातल्या आहेत. अगदी स्वयंपाकापासून ते घर झाडण्या पर्यंत.पण त्याकडे बघण्याची जी दृष्टी लेखक आपल्याला देतो ना ती मात्र वेगळी आहे.ती आपण सहजतेने स्वीकारली तर आपल्याला रस्ता दिसेल.नाहीतर म्हणायचं अवघड आहे हे आणि सोडून द्यायचा रस्ता. हे आपल्यावर आहे यातलं काय आणि कसं आपल्याला लावून घ्यायचं ते.
लेखक झेन साधक आहेत. त्यांच्या मनन,चिंतन,ध्यान आणि साधना यातून त्यांना ज्या गोष्टी उमगल्या आहेत त्या गोष्टी ते आपल्याला सहजतेने सांगत आहेत.वाचतांना वाटतं हे मला कळलं आहे,म्हणून दुसरी गोष्ट वाचायला आपण सुरुवात करतो आणि वाटतं की अजून सुरुवातच झाली नाही.
एक उदाहरण सांगते. आपण कोणाच्या घरी गेलो की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्याला झोप लागत नाही.मग आपण म्हणतो जागा बदलली, माझं पांघरूण नाही जवळ,किंवा अनेक बऱ्याच सवयीच्या गोष्टी.त्याबद्दल एक गोष्ट या पुस्तकात दिली आहे. ती मला खूपच आवडली.याबद्दल लेख म्हणतो की, “समोर जे आहे ते शंभर टक्के स्वीकारण्यापेक्षा आपण त्या ‘मासळी’चा वास शोधत राहतो.त्याच्याशिवाय आपल्याला राहवत नाही.लेखकाने ‘मासळी’ कोणाला म्हटलं आहे हे पुस्तकात नक्की वाचा.
झेन तत्वज्ञानाबद्दल मला फारशी माहिती नाही.पण या पुस्तकातून आपल्याला नक्की काय करायला हवे हे कळते.साध्या सध्या गोष्टीत आपण कसं ‘विलक्षण जागरूक’ राह्यला हवं हे समजतं.आपल्या जवळची सगळी माहिती ,असेल तर आपलं ज्ञान घासून पुसून बाजूला ठेवून ‘फक्त’आपण करत असलेल्या गोष्टीकडे,कृतीकडे कसे बघायचे हे आपण या पुस्तकातून शिकतो.
लेखकाच्या गुरूंनी त्यांना चार मंत्र दिले आहेत.पहिला मंत्र म्हणजे ‘ डोंट मेक एनिथिंग’,दुसरा मंत्र हा आपल्या सगळ्यांसाठी फार फार महत्वाचा आहे, तो म्हणजे ‘डोंट चेक!’ आपण सतत सगळ्यांना चेक करत असतो,शिक्के मारत असतो,त्यात भरपूर वेळ वाया घालवतो.सतत दुसरा काय करतो हे बघत असतो.त्यासाठी हा दुसरा मंत्र. तिसरा मंत्र ‘डोंट अँटँच टू एनिथिंग’याचा अर्थ कशामध्ये ‘अडकून’ राहू नये.चवथा मंत्र म्हणजे ‘डोंट होल्ड एनिथिंग’ आपण कितीतरी गोष्टी माझ्या म्हणून पकडून ठेवतो.
या पुस्तकात अगदी एक-एक पानाच्या गोष्टी आहेत.वाचून फार पटकन होतं पुस्तक,पण समजायला आणि अनुकरण करायला वेळ लागतो. मी किती दिवसापासून पुस्तक धरून आहे.पण खूप काही माहित नाही हेच जास्त कळत गेलं.तरीही रोज एकदा तरी हातात घेतल्या शिवाय राहवत नाही. Thank you sir for your teaching.
जेवढ्या वेळेस वाचू तेवढं आवडत जातं हे पुस्तक.
No photo description available.
Manjusha Gadgil, स्मिता पाटील and 21 others
30 comments
1 share
Like
Comment
Share

30 comments

View 10 more comments

No comments:

Post a Comment