Friday, November 22, 2024

 

#व्यंग4

             काटकसर 

      🥰🥰  “सुनो जी,अजी सुनते हो जी”   अशी हाक मारत नाही तोच, 

“हिंदी मालिका बघणं बंद कर,मी काहीही आणून देणार नाही आधीच सांगतो.” मिस्टर आपल्या मातृभाषेत कडाडले.☹️☹️

मी भाषे भाषेत फरक करत नाही,माझं सगळ्या भाषेवर सारखंच प्रेम आहे.”

“प्रेम आहे ना मग ती नीट शिकून घे.”

“प्रेम करायला कशाला शिकायला लागतं? ते असतंच.”😘😘

“मी भाषेबद्दल बोलतोय.ते सोड तू कशाला एवढ्या गोड आवाजात हाक मारत होती.

 पटकन मुद्दावर आलो तर बाकीचा भाषेचा अन्याय वाचेल याचे शहाणपण आल्याने मिस्टरांनी track ताबडतोब बदलला.

“मला गेहू की आटे की bag  पाहिजे.”🙃🙃

“कशाला? आपल्या घरी गहू आहेत त्याचं पीठ करून आण.”

“तुम्हांला बायकोच्या सर्जनशीलतेचे बिलकुल कौतुक नाही.

 माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया नाही,हे बघून मुद्दा नीट समजवून सांगावा म्हणून पुढे म्हटलं,

 “अहो कालपासून  सरला भाभी  युट्युबवर गेहू की आटे की bag है ना उसका एक फडका शिकवत आहे.”

   😍😍भाभीनी सांगितलेलं मी नीट ऐकलं.आणि तसं केलं.गेहूचा आटा एका डब्यात काढला.ते तिनं सांगितलं नव्हतं.पण स्वतःची अक्कल वापरली की येतं सगळं. मग ती पिशवी स्वच्छ धुतली,नीट मधोमध कापून तिचा लांब तुकडा केला.तिला नवीन कॉटनचा ब्लाउज पिस लावला आणि चारी बाजूला शिवण्यासाठी मशीनवर घेतलं तर सुईच तुटली. 🤓🤓घरच्या माणसांसारखे आमच्या मशिनलासुद्धा आमचं कौतुक नाही.घराचे पैसे वाचवण्यासाठी हे सगळे उद्योग मला करावे लागत आहेत.पण कोणाला आहे का काही त्याचं? मग घाईघाईने शेजारी २० रुपये देवून ते गेहू की आटे की bag का टेबल top शिवून आणला.आणि तो मायक्रोवेव्ह जवळ ठेवला.आता भांडी विसळून झाली की लगेच त्यावर ठेवता येतात. कुठेही पाणी नाही की चिकचिकाट नाही.घरच्या घरी किचन ओट्यावर लागणारा कॉटन top तय्यार.😍😍

 संसार करायचा म्हणजे एवढ्या बारीकसारीक गोष्टींकडे किती निगुतीने मी बघते हे तुमच्या लक्षात आलंच असेल.  😇😇हो हो आमच्या घरचे गहू आहेत,पीठही शेजारीच दळून मिळतं.पण किचन ओट्यावरचा कॉटन top असा सहज कोणीही करू शकत नाही.त्यासाठी मेहनत आणि निर्मितीक्षम मन लागतं.पण कोणाला काय त्याचं? काटकसर हा स्वभावाचा भाग असावा लागतो.तो शिकून थोडाच येतो.😉😉


No comments:

Post a Comment